नमस्कार मित्रांनो, मान्सून पुढच्या आठवडाभरात केरळात (Kerala) दाखल होणार आहे . तर राज्यातील काही ठिकाणी या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त केलेला असून आज आणि उद्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यावेळी मान्सून सर्व सामान्य राहण्याचा अंदाज असून जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये
देशात जवळपास 96 % पाऊस पडण्याची शक्यता वर्तवन्यात आलेली आहे.
राज्यात अवकाळीचा इशारा-
पुढील दोन दिवस राज्यात थोडया ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील 3 दिवस कमाल तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसनं वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून अलीकडे वर्तवण्यात आलेला आहे. मान्सून 4 जूनपर्यंत केरळात दाखल होणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबई मध्ये सुद्धा मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून आढावा बैठका-
मान्सून राज्यात लवकरात लवकर दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महत्त्वाच्या बैठका आयोजित केलेल्या आहेत.
खालील बैठका आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडणार आहेत .
1) राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठक
2) कोकण आपत्ती सौम्यकरण प्रकल्पाची बैठक.
3) मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक.
मुख्यमंत्री या बैठकी मध्ये मान्सूपूर्व कामाचा आढावा घेणार असून, मान्सूच्या पार्श्वभूमीवर या वरील बैठकीचे आयोजन करण्यात आलेल आहे असं बोल जात आहे.